दिवस उजाडतो तो एखाद्या गाण्यानेच. सकाळी उठल्यावर कोणते गाणे
डोक्यात येईल ते सांगता येत नाही. मराठी आणि हिंदी दोन्ही गाण्यांचा मी
तितकाच भोक्ता आहे आणि शास्त्रीय संगीत पण तितकेच आवडते. मी गाणे शिकलेलो
नाही. पण एखादे गाणे गुणगुणताना त्याच रागावरचे एखादे दुसरे गाणे डोक्यात
येते. राग तर कळत नाही. पण गूगल वर शोधले कि लक्षात येते की दोन्ही गाणी
एकाच रागावरची आहेत.
आज दिवस उजाडला तो " पल भर मी ये क्या हो गया " या स्वामी सिनेमातील गाण्याने. एखादे गाणे मनात आले की सतत तेच गाणे गुणगुणत राहतो आणि वेळ मिळाला की you tube वर लगेच ते गाणे बघतो. स्वामी सिनेमातील हे गाणे राजेश रोशन या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले आहे. राजेश रोशन ची कारकीर्द सुरु झाली ती मेहमूद याच्या कुंवारा बाप या सिनेमाने. या सिनेमातील सर्वच गाणी गाजली. मोहम्मद रफी याचे 'सज रही गली मेरी माँ आणि " आ री आ जा " ही गाणी विषेश्वताने गाजली. 'सज रही गली " या गाण्यात तृतीयपंथी लोकांचा कोरस होता आणि पूर्वी असा कोरस कधीच वापरला गेला नव्हता.

राजेश
रोशन याचे वडील प्रसिद्ध संगीतकार रोशन. रोशन यांचे १९६७ साली निधन झाले.
त्यांच्या विषयी नंतर कधी तरी. रोशन यांचा कोणताही ठसा राजेश रोशन यांच्या
संगीतात आढळत नाही. १९७४ साली आलेल्या कुंवारा बाप च्या वेळेस राहुल देव
बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि कल्याणजी आनंदजी यांची सद्दी होती. अशा
वेळेस राजेश रोशन यांनी त्यांची एक विशिष्ट शैली त्यांच्या संगीतात आणली,
त्यांच्या ज्युली, स्वामी, प्रियतमा, खट्टा मीठा, दुसरा आदमी, इन्कार अशा
अनेक चित्रपटांचे संगीत ऐकले की हे जाणवते. किंबहुना तीच त्यांची मर्यादा
पण होती. त्यामुळेच कदाचित एक मर्यादित यश त्यांना लाभले आणि नंतर तर भाऊ
राकेश रोशन यांच्या चित्रपटापुरतेच त्याचे संगीत मर्यादित राहिले.
त्यांनी सुरवातीच्या काळांत मात्र अनेक सुमधुर गाणी दिली त्यापैकीच हे एक. प्रत्येक जुन्या संगीतकाराची "लता" हे समीकरण अनुभवायची गोष्ट असते तेच राजेश रोशन आणि लता यांच्या गाण्याबद्दल म्हणता येईल.
खरं तर प्रत्येक संगीतकाराचे संगीत ही अभ्यासण्याची गोष्ट आहे. जसे जसे प्रत्येक संगीतकाराचे संगीत ऐकत गेले की थक्क व्हायला होते आणि त्यावर लिहिण्यासारखे ही खूप आहे. अर्थात हे माझ्यासारख्या सामान्य रसिकाचे मत आहे. जो संगीत शिकला आहे तो त्यावर अधिक अधिकारवाणीने लिहू शकतो. मी फक्त रसिकाच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे

No comments:
Post a Comment