आज सहज खप वर्षांनी महल (१९६९) च्या सिनेमाची आठवण झाली. मी १९६९ साली
हा सिनेमा पुण्याच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात बघितला होता तेव्हा मी ८ वीत
होतो. सिनेमा बद्दल फारसे आठवत नाही पण सिनेमातील गाणी खूप आवडली होती.
पुढे जेव्हा ११ वीत असताना गाण्याची आवड वाढली गाण्याचा अभ्यास वाढला आणि
मग गायक, गीतकार, संगीतकार अशा गाण्याचे सर्व पैलू डोक्यात बसावयास लागले.
वेगवेगळ्या संगीतकारांचे संगीत त्यांच्या orchestration ची पद्धत अशा
विविध गोष्टी लक्षात येऊ लागल्या. ही अर्थात
सर्व विविध भारती ची कृपा. ८ x ३ च्या छोट्याश्या खोलीत आम्ही सर्व मित्र
विविध भारती ऐकत असू. मधे मधे जमेल तसा अभ्यास करत असू. गाण्याच्या
चालीवरून त्याच्या orchestration वरून संगीतकार ओळखता येऊ लागले.
किंबहुना तो एक छंद जडला.
संगीतकार कल्याणजी आनंदजी ह्यांची एक स्वतःची शैली आहे ( जशी त्या काळातील
सर्वच संगीतकारांची होती) महल सिनेमातील ह्या गाण्याच्या चालीवर आणि संगीत
संयोजन यावर त्यांचा पूर्ण ठसा आहे.अत्यंत गोड चाल, किशोर आणि आशा च्या
असंख्य सुमधुर गाण्यांपैकी हे एक थोडेसे विस्मृतीत गेलेले गाणे
No comments:
Post a Comment